चिल्हे येथे गावठी हातभटटीच्या दारू विक्रीवर कोलाड पोलिसांची धडक कारवाई
I कोलाड I कल्पेश पवार I
दारु बाळगणे व तिची विक्री करणे कायद्याने सर्वत्र बंदी असताना चिल्हे आदिवासीवाडी येथे राहत्या घराच्या मोकळ्या जागेत राजरोसपणे अवैध गावठी दारू विक्री होत असल्याची खबर कोलाड पोलिसांना लागताच कोलाड सपोनि सुभास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचून या दारू विक्रीवर कारवाई केली आहे.
या बाबत पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दिनांक २ जुलै रोजी दुपारी 15:15 वा. चिल्हे आदिवासीवाडीत आरोपीच्या घरामागील मोकळ्या जागेत महिला आरोपीने एकूण 400 रुपयांचा प्रोव्हीबिशनचा माल, गावठी हातभटटीची दारू, विनापरवाना विक्री करत असल्याचे दिसून आले. सदर गुन्ह्यातील एकूण 400 रुपयांचा माल पोलिसांनी जप्त केला असून महिला आरोपी विरोधात कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास मपोह जाधव ह्या करीत आहेत.