| रत्नागिरी | वृत्तसंस्था |
आजपासून राज्यात कोविड निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर रत्नागिरीतील हॉटेलसह अन्य दुकाने,मॉल सुरू झाले आहेत. यापूर्वी हॉटेलमधून पार्सल सुविधा होती. हॉटेलात बसून खवय्यांना आवडते पदार्थ खाण्याची संधी मिळाली.
उपहारगृहे खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेने खालील अटीच्या पुर्ततेच्या अधीन राहून सुरू करण्याची मुभा देण्यात येत आहे. उपहारगृह,बारमध्ये प्रवेशकरताना प्रतिक्षा कक्षात अथवा जेवण मिळेपर्यतच्या कालावधीत मास्कचा वापर अनिवार्य राहील व याबाबतच्या स्पष्ट सुचना उपहारगृह आस्थापनांनी उपहारगृहात लावणे आवश्यक राहील. उपहारगृह,बारमध्ये काम करणारे आचारी, वाढपे, व्यवस्थापक व स्वच्छता कर्मचा-यांसह सर्व कर्मचार्यांचे कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण करणे आवश्यक राहील व ज्या कर्मचार्यांच्या लसीकरणाच्या दोन मात्रा आणि दुसरी मात्रा घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण झाले आहे. असेच कर्मचारी व व्यवस्थापक उपहारगृह,बारमध्ये काम करू शकतील तसेच या सर्व कर्मचारी व व्यवस्थापनाने उपहारगृहात मास्कचा वापर करणे अनिवार्य राहील तसेच दुकानात काम करणार्या सर्व व्यवस्थापन व कर्मचार्यांचे कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहिल.
जिल्हयातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉलमध्ये काम करणार्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणार्या सर्व नागरिकांचेही कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक राहील व तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहीत ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक आहे.जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा सुरू करण्यात आले आहेत.वातानुकुलित तसेच विनावातानुकुलित जिम्नॅशिअम, योगसेंटर, सलून स्पा 50 टक्के क्षमतेने सर्व दिवस रात्री 10.00 वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, उक्त संस्था वातानुकूलीत असल्यास, वायुविजनासाठी फॅन व वातानुकूलनासह खिडकी अथवा दरवाजा उघडा ठेवणे आवश्यक राहील.