। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील गोवे येथील रहिवासी रमेश जाधव यांचे गुरुवार दि.14 ऑक्टोबर रोजी निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 62 वर्षाचे होते. ते पंढरपूर आळंदी वारी नित्यनेमाने करीत होते.त्यांना किर्तनाची आवड होती. त्यांच्या मृत्युची वार्ता समजताच त्यांच्या अंत्यदर्शनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन मुली, दोन भाऊ, दोन बहिणी, सून, भावजया, चुलते, चुलतभाऊ, पुतणे, जावई, नातवंडे मोठा जाधव परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दि.23 ऑक्टोबर तर उत्तरकार्य विधी मंगळवार दि 26 ऑक्टोबर रोजी त्यांच्या गोवे येथील निवास्थानी होणार आहेत.