| इंग्लंड | वृत्तसंस्था |
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघ लंडनला रवानाही झाला. भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून लंडनमध्ये रवाना झाल्याचे माहिती चाहत्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीदेखील दुसर्या कसोटी सामन्यासाठी लॉर्ड्सवर हजेरी लावणार आहे. पहिल्या कसोटी सामन्यातील सर्व खेळाडू लॉर्ड्सवरील कसोटी सामन्यासाठी लंडनला पोहचले असले तरी सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ ही मुंबईकर जोडी अद्यापही नॉटिंघममध्येच आहे. त्यांना 13 तारखेपर्यंत क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करायचा आहे. त्यानंतर ते संघाला जॉईन होतील.