। उत्तर प्रदेश । वृत्तसंस्था ।
उत्तर प्रदेशातील झांसी येथे एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका हॉस्पिटलच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) भीषण आग लागली. हि घटना शुक्रवारी (दि. 15) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत 10 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, 17 बालके गंभीर जखमी झाली आहेत.
उत्तर प्रदेशातील झांसी येथील महाराणी लक्ष्मीबाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवजात अतिदक्षता विभागात (NICU) भीषण आग लागली. हि घटना शुक्रवारी (दि. 15) रात्री 10.45 वाजताच्या सुमारास घडली. NICU विभागात ऑक्सिजनच्या भरमसाठ प्रमाणामुळे काही क्षणांत आग वेगाने पसरली. या आगीत श्वास गुदमरल्यामुळे 10 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, 17 बालके गंभीर जखमी झाली असून त्यांना वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात व खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेतील मृत झालेल्या 10 बालकांपैकी 7 बालकांची ओळख पटली आहे, तर 3 बालकांची ओळख अद्याप पटलेली नाही.