शेतकर्यांसाठी खरीप पिक स्पर्धेचे आयोजन
पोलादपूर | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यामध्ये पीक वाढीसाठी प्रोत्साहन निर्माण होण्याच्या दृष्टीने भात, नाचणी (रागी), तुर इत्यादी पिकांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आली असून शेतकर्यांनी अधिकाधिक सहभाग घेण्याचे आवाहन पोलादपूर तालुका कृषी अधिकारी तथा उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी केले आहे.
या पिकस्पर्धेच्या अटी व शताअमध्ये पीक स्पर्धेसाठी पीकनिहाय तालुका एक घटक आधारभुत धरण्यात येईल. खरीप हंगामासाठी स्पर्धेतील समाविष्ट पीके- भात, नाचणी (रागी), तुर इत्यादी पीके आहेत. प्रती तालुका किमानस्पर्धेक संख्या- सर्वसाधारण गटासाठी 10 व आदिवासी गटासाठी 05 पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखाली किमान 10 आर क्षेञावर सलग लागवड करणे आवश्यक आहे. पुरेसे अर्ज प्राप्त झालेवर संबधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी जाहीर करतील. तालुक्यात पिक कापणी प्रयोग घ्यावयाची किमान संख्या- सर्वसाधारण गटासाठी 05 व आदिवासी गटासाठी 04 स्पर्धेत भाग घेणार्या शेतकर्याला एकाच वेळी एकापेंक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पिक निहाय प्रत्येकी रक्कम तीनशे रुपये प्रवेश शुल्क असून अर्ज दाखल करण्याची तारीख- भात, नाचणी व तुर- 31 ऑगस्ट 2021 आहे.
रायगड जिल्हयातील शेतकर्यांनी महाड, पोलादपुर, म्हसळा व श्रीवर्धन या तालुक्यातील आपआपल्या गावामध्ये काम करणारे कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच खरीप हंगाम 2021 साठी देखील तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी भात, नाचणी व तुर या खरीप पिकासाठी 31 ऑगस्ट 2021 पुर्वी अर्ज सादर करुन पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाड उपविभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी कैलास धुमाळ यांनी महाड, पोलादपुर, म्हसळा व श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्यांना केले आहे.
पिकस्पर्धेत भाग घेवू इाच्छिंणार्या स्पर्धकांचे विहीत नमुन्यात अर्ज भरुन त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, 712, 8अ चा उतारा व जात प्रमाणपञ (केवळ आदिवासी असल्यास) या कागद पत्राची पुर्तता करुन संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात द्यावेत, स्पर्धेचे नियम व सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
कैलास धुमाळ, उपविभागीय कृषी अधिकारी चौकट
गाव ते जिल्हा पातळीपर्यंत बक्षिस
सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी स्पर्धेतील पहिल्या, दुसर्या व तिसर्या क्रमांकाची बक्षिसे तालुका पातळीवर 5हजार रूपये प्रथम, 3 हजार रूपये द्वितीय, 2 हजार रूपये तृतीय, जिल्हा पातळीवर 10हजार रूपये प्रथम, 70हजार रूपये द्वितीय, 5 हजार रूपये तृतीय, विभाग पातळीवर 25 हजार रूपये प्रथम, 20 हजार रूपये द्वितीय, 15 हजार रूपये तृतीय, राज्य पातळीवर 50 हजार रूपये प्रथम, 40 हजार रूपये द्वितीय, 30हजार रूपये तृतीय अशी आहे.