| पनवेल | वार्ताहर |
राज्यातील पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या झालेल्या बदल्यांमध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यकाळ पूर्ण झालेल्या 8 पोलीस निरीक्षकांच्या बदल्या इतरत्र करण्यात आल्या आहेत. तर, नव्याने 17 पोलीस निरीक्षक नवी मुंबईत दाखल होणार आहेत. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या बदलीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांची वाट न पाहता त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे सूचित केले आहे. तसेच, जे पोलीस अधिकारी बदली झालेल्या ठिकाणी कार्यमुक्त करुन देखील वेळेत बदलीवर हजर होणार नाहीत, अशा पोलीस अधिकाऱ्यांविरोधात घटकप्रमुखांनी शिस्तभंगाची कार्यवाही सुरु करण्याचे आदेश देखील दिले आहेत.





