आजपासून संपावर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मानधन वाढवून देण्याच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील 1 हजार 727 आशा सेविकांसह राज्यातील 72 हजार आशा सेविका आज मंगळवारपासून संपात सहभागी आहेत. तुटपूंजे मानधन मिळत असूनही या आशाताईंनी कोरोना काळात जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून अत्यावश्यक असणार्या ठिकाणी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय देखील घेतला आहे.
राज्यात 72 हजार आशा वर्कर आणि चार हजार गट प्रवर्तक आहेत. या सर्वांनी एकत्र येऊन 15 जूनपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. पेंद्र सरकार कोरोना कामाचे रोजचे 35 रुपये प्रमाणे महिन्याला एक हजार रुपये देते पण तेही वेळेत मिळत नाहीत. राज्य सरकार 4 हजार रुपये देते. पण आरोग्य विभागाची 72 प्रकारची कामे बंद पडली आहेत. त्यामुळे तीन हजार रुपये मानधन कापले जाते. ग्रामीण भागात कोरोना काळात डॉक्टर्सची सर्व कामे आशा वर्कर करतात.
मागण्या कोणत्या
आशा सेविका, गट प्रवर्तक महिलांसाठी प्रत्येक जिह्यात हॉस्पिटलमध्ये राखीव खाटा ठेवाव्यात, मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज, सॅनिटायजर द्यावेत, आशा कर्मचाऱयांना व त्यांच्या कुटुंबीयांना सरकारने विमा कवच किंवा आरोग्य सुविधा पुरवाव्यात, नियमानुसार काम अपेक्षित असताना आशा सेविकांना बारा तास काम करावे लागते. त्यामुळ कामाचे तास निश्चित करणे.