स्थानिकांनी पाठलाग करून कर्नाळ्यात ट्रेलर पकडला
ट्रेलर चालक ताब्यात
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मुंबई गोवा महामार्गावर आज झालेल्या भीषण अपघात भरधाव ट्रेलर वरील नियंत्रण सुटल्याने पेण तालुक्यातील गोविर्ले येथे 6 गाड्यांना उडवले. यात अनेक जखमी झाले आहेत. तर गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हा अपघात झाल्यानंतर ट्रेलर न थांबवता चालकाने पुढे नेत पुन्हा खारपाडा येथे आणखी तीन गाड्यांना उडवल्याचे वृत्त हाती आले आहे.