पहिल्याच फेरीत पराभवाने स्पर्धेबाहेर
टोक्यो | वृत्तसंस्था |
टोक्यो ओलिम्पिकमध्ये भारताला पदक जिंकवून देण्यासाठी एक प्रबळ दावेदार असणारी टेनिस स्टार सानिया मिर्झा ही अंकिता रैनासोबत मिळून महिला डबल्सच्या पहिल्याच फेरीत पराभूत झाली आहे. भारताच्या या जोडीला टेनिस खेळाच्या महिला डबल्समध्ये युक्रेनच्या महिला जोडीने दारुण पराभूत केले.
सानिया आणि अंकिता यांनी सामन्याची सुरुवात जोरदार केली. दोघींनी पहिला सेट 6-0 च्या फरकाने जिंकला. पण, त्यानंतर पुढील दोन सेट गमावले. पहिला सेट जिंकणारी ही जोडी दुसर्या आणि तिसर्या सेटमध्ये 6-7(0) 8-10 च्या फरकाने पराभूत झाली. ज्यामुळे महिला डबल्समधील पहिल्या फेरीतील सामना 6-0, 6-7(0), 8-10 च्या फरकाने भारताच्या हातातून गेला.