पंतप्रधानांची घोषणा
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती, एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली आहे.
केंद्र सरकारने सुरु केलेल्या या क्रॅश कोर्समुळे आरोग्य क्षेत्राला एक नवीन उर्जा मिळणार असून युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसेच देशात 21 जूनपासून व्यापक लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
नरेंद्र मोदी,पंतप्रधान
पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोविड -19 फ्रंटलाइन कामगारांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाची सुरुवात केली. 26 राज्यांमधील 111 प्रशिक्षण केंद्रांमध्ये हा क्रॅश कोर्स प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे. केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री महेंद्र नाथ पांडे यावेळी उपस्थित होते.
कोरोना व्हायरस अजूनही आहे आणि त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आपल्याला अधिक काळजीपूर्वक आणखी तयारी करावी लागेल या उद्दिष्टाने एक लाख फ्रंटलाइन वॉरियर्सनी तयार करण्याची मोहीम शुक्रवारपासून सुरू होत आहे. 21 जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस देण्यास सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला कोरोना संदर्भातील नियमांचे पालन करावे लागेल असे पंतप्रधान मोदींनी म्हटले.
देशभरातील एक लाखांहून अधिक कोव्हिड वॉरियर्सनी कौशल्यपूर्ण बनवण्याचे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. कोविड योद्धांना होम केअर सपोर्ट, बेसिक केअर सपोर्ट, अॅडव्हान्स केअर सपोर्ट, इमरजन्सी केअर सपोर्ट नोकरीच्या क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जाईल. केंद्रीय कौशल विकास योजना 3.0 अंतर्गत या कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून या योजनेसाठी एकूण रु. 276 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
देशात 21 जूनपासून लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू होत आहे. यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. प्रत्येक नागरिकाला लोकांना मोफत लस देण्याचे सरकार वचनबद्ध आहे, आपल्याला कोरोना संदर्भातील प्रोटोकॉलचे पालन करावे लागेल,असेही त्यांनी सुचित केले.