पनवेल | वार्ताहर |
बहिणीच्या अनैतिक संबंधातून 4 जणांनी मिळून एका इसमाला जीवे ठार मारल्याची घटना कामोठे येथील जुई गाव या ठिकाणी घडली आहे.
यातील आरोपी रोशनलाल उर्फ दिलीप गणेश साहू (21 रा.जुई गाव), संदीप गणेश साहू (19 रा.जुई गाव) यांची बहिण मीना साहू हिचे रोशन नावाच्या इसमाबरोबर अनैतिक संबंध होते. सदर अनैतिक संबंधांस त्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांच्या बहिणीच्या सांगण्यावरुन रोशन, मयत इसम बडे उर्फ लक्ष्मीकांत मिश्रा व त्याचा एक साथीदार यांनी संदीप साहू याच्या घरी जावून त्यास मारहाण केली होती. त्यामुळे सदर गोष्टीचा राग मनात धरुन रोशन, मयत बडे उर्फ लक्ष्मीकांत मिश्रा व त्यांचा एक साथीदार यांना धडा शिकवून त्यांना संपविण्याच्या उद्देशाने तिच्या दोघा भावांसह इतर दोघा मित्रांनी त्यांना चर्चा करण्यासाठी बोलावून त्यामध्ये मयत बडे उर्फ लक्ष्मीकांत मिश्रा यास पकडून त्या चौघांनी मिळून त्याला लाथाबुक्क्याने मारहाण करून तसेच एकाने त्याच्या छातीमध्ये चाकू भोसकून त्याला गंभीर दुखापत करून जीवे ठार मारुन ते पळून गेले आहेत. याबाबतची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात होताच सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके ठिकठिकाणी रवाना झाली आहेत.