अलिबाग तालुक्यात 186 नवे रुग्ण

रायगड

अलिबाग । विशेष प्रतिनिधी

अलिबाग तालुक्यात बुधवारी कोरोनाच्या 186 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, उपचारादरम्यान दोन रुग्ण दगावले आहेत. दिवसभरात 109 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 11 हजार 391 झाली आहे. यापैकी 285 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 7 हजार 644 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यःस्थितीत तालुक्यातील 3 हजार 462 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version