आगरकोट किल्ला प्रवेशद्वाराची पडझड


। रेवदंडा । वार्ताहर ।
रेवदंडा आगरकोट किल्ल्यात विशेषतः चौकोनी बुरूजाकडे प्रवेश करण्यासाठी मोठे बंदरकडून येणार्‍या मार्गात असलेले पोर्तुगिजकालीन प्रवेशव्द्वाराला तिठा असे संबोधले जाते. या तटबंदीवर असलेल्या तिठावर पोर्तुगिज बोधचिन्ह होते. हे बोधचिन्ह ढासळले आहे.
रेवदंडा आगरकोट किल्ल्यास भेटीस येणार्‍या इतिहासप्रेमी व पर्यटकांचे या तिठावरील बोधचिन्ह नेहमी लक्ष्य वेधून घेत होते. काही दिवसापुर्वी तिठा वरील पोर्तुगिज बोधचिन्ह तटाचे भिंतीतून निसटले व तुटून पडले आहे. ऐतिहासिक रेवदंड्याचे साक्षीदार असलेले व आगरकोट किल्ल्यातील पोर्तुगिजाचे स्वामित्व दाखविणारे बोधचिन्ह दुरावस्थेने पडल्याने इतिहासप्रेमी मंडळीने नाराजी व्यक्त केली आहे. आगरकोट किल्लाच्या प्रवेशद्वार असलेल्या तिठावरील पोर्तुगिजकालीन बोधचिन्ह, शिल्प दुरावस्थेतने विस्मृतीत गेले असून यापूढे पहावयास मिळणार नसल्याचे खंत अनेकांनी व्यक्त केली.
रेवदंडा आगरकोट किल्लात अनेक पोर्तुगिज कालीन असलेल्या बोधचिन्ह व शिल्पाचे पुरातत्व खात्याने यांचे जतन करण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे असे इतिहासप्रेमी मंडळीचे म्हणणे असून आगरकोट किल्लातील प्राचीन वस्तू व शिल्पे यांना संरक्षीत करण्याची मागणी केली जात आहे.

Exit mobile version