आर्या तर्फे वनौषधी रोपांचे वाटप


पनवेल | वार्ताहर |

जागतिक पर्यावरणदिनाचे औचित्य साधून आर्या वनौषधी संस्थेच्यावतीने वनौषधी रोपांचे वाटप करण्यात आले.या वेळी नागरिकांना वनौषधींची माहिती असलेली माहिती पत्रके वाटप करून जनजागृतीही करण्यात आली.सदर कार्यक्रमात आर्या पाटील,जागृती पाटील यांच्या हस्ते डॉ.स्नेहा केणी,सेंट मेरी स्कुलच्या मुख्याध्यापिका मीना मॅडम,आरती ओझा आदी मान्यवरांना वनौषधींची रोपे भेट देण्यात आली.या वर्षीही संस्थेच्या सदस्यांनी नागरिकांच्या घरी जावून त्यांना वनौषधी रोपे भेट दिली.या मध्ये सफेद मुसळी, अश्‍वगंधा, दमवेल,अर्जुन,पर्णबीज, केवडा,चित्रक,सीतेचा अशोक ,बेल आदीचा समावेश होता. या जनजागृती कार्यक्रमात वनौषधी तज्ञ सुधीर पाटील यांनी माहिती दिली.

Exit mobile version