। म्हसळा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मित्रांनी आणि घराचे काम करणाऱ्या मिस्त्र्याने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संतापजनक प्रकार ऑगस्ट 2025 ते जुलै 2026 या कालावधीत घडला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार, तिचा आणि त्याचे साथीदार सर्व रा. वाशी हवेली, ता. तळा) यांनी तिला धमकावून, फसवून वेळोवेळी बोलावून तिच्यावर अत्याचार केले. एवढंच नाही तर एप्रिल 2026 ते जून 2026 दरम्यान पीडितेच्या घराचे काम करणारा मिस्त्रीने मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत घरात जबरदस्तीने शिरून तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. याआधी देखील 23 ऑगस्ट रोजी अनुसूचित जातीच्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती.
या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने म्हसळा तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास म्हसळा पोलीस करत असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. या पाच आरोपींपैकी दोन आरोपी हे अल्पवयीन असल्याचे समजते. पोलीस उप-अधीक्षक आणि म्हसळा पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेंद्र जाधव, सपोनि चव्हाण हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.






