। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणच्या नूतन विद्यालय कर्णिक रोड कल्याण येथे पर्यावरण दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला असून एक विद्यार्थी, एक रोप या उपक्रमाअंतर्गत जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.
यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे 2016 साली शाळेत वृक्षारोपण केले गेले होते, त्या वृक्षांना पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांचा तुळस रोप देऊन सत्कार करण्यात आला. केवळ वृक्षलागवड नाही तर वृक्षसंवर्धन, वृक्ष संरक्षण करण्याचा सर्वांनी निर्धार करावा असे मा. मुख्याध्यापिका सौ. सय्यद मॅडम यांनी यावेळी आवाहन केले.
या कार्यक्रमा प्रसंगी माजी आ.नरेंद्र पवार, संस्था पदाधिकारी धनंजय पाठक, भारती वेदपाठक त्याचप्रमाणे शाळेच्या मुख्याध्यापिका रेश्मा सय्यद आदी सर्व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी या प्रसंगी उपस्थित होते.