। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरातील निसर्गप्रेमी नागरिकांनी एकत्र येत कळसगिरीच्या परिसरात हिरवाईसाठी बिजरोपणाचा उपक्रम संपन्न केला. सकाळी आठ वाजल्यापासून निसर्गप्रेमींनी शेकडोंच्या संख्येने बिज रोपणासाठी हनुमान टेकडी गाठली. दिवसेंदिवस विरळ होत चाललेल्या वनसंपदेला पूर्ववत करण्यासाठी हेमंत गांगल यांनी पुढाकार घेऊन ही संकल्पना मांडली होती.
निसर्ग प्रेमी नागरिक तसेच वनसंरक्षक विश्वजित जाधव, डॉ.मनोहर खके-कृषी तज्ञ, हेमंत गांगल, सुखद राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या उपक्रमात रोहा लायन्स क्लब, रोटरी क्लब, डॉ सी.डी.देशमुख महाविद्यालय, सृष्टी फाऊंडेशन, रोहा अष्टमी नगरपरिषद, ब्राह्मण मंडळ, वनखाते या संस्थानी सहभाग घेतला. बिजरोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नुरूद्दीन रोहावाला, समीर सकपाळ, नरेश सकपाळ, नितीन पिंपळे, महेंद्र गुजर, रविंद्र घरत, किर्ती शेठ, मयुर दिवेकर, अतुल साळुंखे, हेमंत ओक, आशिष शहा, राजू जैन सचिन जैन यांनी विशेष मेहनत घेतली