| महाड | प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील पाने परिसरात काळ नदीच्या पात्रात 20 वर्षीय वेदांत बोंडलेकर वाहून गेल्याची घटना घडली. पाण्यात मौजमजा करताना नदीच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने तो पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेतली. नदीपात्र तसेच परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी बचाव पथकाकडून प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, पावसाळ्यात नदी, धबधबे आणि जलाशयांमध्ये उतरताना पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.






