कृषी दुकानं दिवसभर सुरु

मुंबई | प्रतिनिधी |

राज्यात 15 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी खरीप हंगाम लक्षात घेता राज्यातील कृषी क्षेत्राशी संबंधित सर्व आस्थापनं दिवसभर सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे. परभणीत कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कृषी क्षेत्राच्या लातूर विभागीय आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शेतकर्‍यांची कोणत्याही परिस्थितीत कुठेही अडचण होऊ नये याचा विचार करुन आता सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत शेती आणि शेतीशी निगडीत सर्व आस्थापनं चालू ठेवण्यास अनुमती देण्याचे निर्देश त्यांनी या बैठकीत सर्व जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

Exit mobile version