| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीने ग. बा. वडेर हायस्कूल व व. ग. ओसवाल ज्युनियर कॉलेज सुधागड-पाली येथे आयोजित सेवा संकल्प अभियान 2026 अंतर्गत सुधागड तालुका स्तरीय पावसाळी क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.19 वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत मुले प्रथम क्रमांक ग. बा. वडेर हायस्कूल व व. ग. ओसवाल ज्युनियर कॉलेज, पाली तर द्वितीय क्रमांक संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नांदगाव तसेच 19 वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेत मुली प्रथम क्रमांक बल्लाळ विनायक विद्यालय पाली, द्वितीय क्रमांक ग. बा. वडेर व ओसवाल ज्युनियर कॉलेज, पाली
यावेळी स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंचे मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन अभिनंदन करण्यात आले. तसेच ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. त्याबद्दल तालुका क्रीडा प्रमुख मोहन म्हात्रे, त्याचे सहकारी सर्व शाळांचे क्रीडा व्यवस्थापक पंच यांचे जिल्हा क्रीडा अधिकारी अंकिता मयेकर यांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले. पालीच्या ग. बा. वडेर कॉलेजच्या संघाने मुले गटात प्रथम क्रमांक तर मुली द्वितीय क्रमांक पटकावल्याने सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा, प्राचार्य, क्रीडा शिक्षक व सर्व शिक्षकवृंदाने विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले.







