। उरण । वार्ताहर ।
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त घारापुरी येथे वृक्षारोपण व माझी वसुंधरा अंतर्गत सामुहिक शपथ व वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोव्हिडमुक्त घारापुरी अंतर्गत आरोग्य उपकेंद्राच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व ग्रामस्थांना कोरोना लसीकरण करण्यात आले.
घारापुरी बेटावरील 125 ग्रामस्थांना लसीकरणाचा लाभ घेता आला असून येथील ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच लवकरच उरलेल्या ग्रामस्थांना लस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी राजिप, जिल्हा परिषदेचे सदस्य विजय भोईर, पंचायत समिती सदस्य दिपक ठाकुर, मोरे जिल्हा आरोग्य अधिकारी, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी निलम गाडे, बांधकाम विभागाचे देवांक आदी मान्यवर उपस्थित होते.
घारापुरी येथे माझी वसुंधरा अभियान
