| उरण | प्रतिनिधी |
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान अंतर्गत घारापुरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना लोकल गाईड ओळखपत्र देण्यात आले. मंगळवारी (दि.14) घारापुरी ग्रामपंचायत कार्यालय येथे छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात ओळखपात्रांचे वाटप करण्यात आले. घारापुरी हे बेट असल्याने बेटावर रोजगारासाठी अन्य कोणताही पर्याय नसल्याने या ओळखपत्रामुळे या ग्रामस्थांना रोजगार करण्यास सोपे जाणार आहे. याआधी सुद्धा ग्रामपंचायत मार्फत लोकल गाईड यांना ओळखपत्र देण्यात आले आहे. घारापुरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजना सेवा सवलती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यात येतात. ग्रामपंचायत जनकल्याणासाठी नेहमी अग्रेसर असल्यामुळे जनतेने या ग्रामपंचायतच्या कार्याचे कौतुक केले आहे.







