| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग सह राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात बालरोग तज्ज्ञ म्हणून प्रख्यात असणारे डॉ. अरविंद पाटणकर यांना गुरुवारी (दि.12) राहत्या घरी देवाज्ञा झाली. निधनासमयी त्यांचे वय 84 वर्षे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा सून व नातू असा त्यांचा परिवार आहे. अलिबाग तालुक्यातील ग्रारीण भागासह रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात लहान मुलांचा डॉक्टर म्हणून डॉ. अरविंद पाटणकर यांच्या नावाची ख्याती आहे. डॉ.अरविंद पाटणकर यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी रायगड जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, क्रीडा, वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपली हजेरी लावली होती.





