| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या महिला विकास कक्षातर्फे महिला सुरक्षा आणि कायदा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक पीएनपी बी. एड. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. ॲड. रुतिशा पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक प्रा. ॲड. रुतिशा पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना महिलांसाठी असणारे कायदे कलम आणि गुन्हा घडल्यानंतर होणारी शिक्षा याविषयी सखोल माहिती दिली. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना मुंबई विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील महिला सक्षमीकरण कक्ष कशा प्रकारे कार्य करते याकडे लक्ष केंद्रित केले. तसेच कवितेद्वारे विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा पाटील, प्रास्ताविक डॉ. अमृता कुमारी यांनी केले तर आभार डॉ. रसिका म्हात्रे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रा. वृषाली घरत, प्रा.पूजा पाटील, प्रा.रुपाली पाटील, प्रा.जयश्री ठाकूर, प्रा. संजना पाटील, प्रा. हर्षल काठे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







