दोन माजी पंतप्रधानांसह तिघांना भारतरत्न जाहीर

| दिल्ली | वृत्तसंस्था |

भारताचे माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि डॉ. एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या भारतरत्न पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत माहिती दिली.नरसिंह राव हे 20 जून 1991 मध्ये पंतप्रधान होते. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री म्हणून अनेक वर्षे काम केलं.

एम एस स्वामिनाथन हे भारतीय अनुवंशशास्त्रज्ञ होते. ज्यांना भारताच्या हरित क्रांतीचे जनक मानले जाते. त्यांनी 1966 मध्ये पंजाबमधील देशी वाणांसह मेक्सिकोतील बियाणे मिसळून उच्च उत्पादक गव्हाचे संकरित बियाणे विकसित केले होते. विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रात भारत सरकारने त्यांना 1972 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. चौधरी चरण सिंग हे एक शेतकरी, राजकारणी आणि भारताचे पाचवे पंतप्रधान होते. 28 जुलै 1979 ते 14 जानेवारी 1980 पर्यंत त्यांनी पंतप्रधान पद भूषवले. चौधरी चरणसिंग यांनी आपले संपूर्ण आयुष्य भारतीयत्व आणि ग्रामीण वातावरणाच्या प्रतिष्ठेत जगले.

Exit mobile version