| म्हसळा | प्रतिनिधी |
जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशान्वये पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवड करण्यात आली. परंतु, म्हसळा तालुका पंचायत समिती पद हे अनु. जाती (महिला ) राखीव होते. अनु. जाती चे नियमानुसार आरक्षण न पडल्यामुळे सभापती पद रिक्त ठेवण्यात आले. त्यामुळे फक्त उपसभापती यांची निवड करण्यात आली. मात्र, जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशानुसार प्रभारी सभापती पदाचा कार्यभार उपसभापती बबन श्रीपत मनवे यांच्याकडे सोपविण्यात आला. या प्रसंगी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते लहू अंबाजी म्हात्रे, पं. स. सदस्या समृद्धी चाचले, पं.स.सदस्य प्रियांका निंबरे, तालुका अध्यक्ष समीर बनकर, रेश्मा कानसे, महिला अध्यक्षा मीना टिंगरे, माजी अध्यक्षा सोनल घोले, श्रीपत मनवे, माजी उपसभापती मधुकर गायकर, माजी सभापती छाया म्हात्रे, महेश घोले, संतोष (नाना) सावंत, किरण पालांडे, अनिल टिंगरे, माजी उपसभापती संदिप चाचले, प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना नवनिर्वाचित प्र. सभापती बबन मनवे यांनी सांगितले कि खासदार सुनिल तटकरे, नाम. आदिती तटकरे आणि मा. आमदार अनिकेत तटकरे यांनी मला सुरुवातीला जिल्हा परिषद सदस्य आणि कृषी सभापती आणि आता प्र. सभापती पद देऊन माझ्यावर जो विश्वास टाकला तो मी निश्चितपणे सार्थकी लावेन, सर्वाना विश्वासात घेऊन पंचायत समितीचा पारदर्शक कारभार करीन आणि कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे सांगितले. पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्व कर्मचारी यांनी नवनिर्वाचित प्र. सभापतींना शुभेच्छा दिल्या.







