। पनवेल । प्रतिनिधी ।
पगार मागण्यास गेले असता शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी आरोपी विरोधात खारघर पोलीस ठाण्यात 11 एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. मेहकर शमशाद शेख हा मुंबई येथे राहत असून, तो किरण एंटरप्रायजेस कंपनी सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम करत होता. 55 हजार रुपये या पगारावर चार महिने काम केले. त्यावेळी कंपनीने दोन महिन्याचा पगार दिला आणि दोन महिन्याचा पगार दिला नाही. राहिलेला पगार मागण्यास गेले असता आरोपींनी पगार देणार नाही असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली.







