बांगलादेशी विशेष पथकाची कारवाई; महिलेने केलेल्या तक्रारीची घेतली दखल
|रायगड । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा पोलिसांच्या बांगलादेशी विशेष पथकाने स्थानिक महिलेच्या तक्रारीवरून पेण शहरातून एका बांगलादेशी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान ती महिला बांगलादेशी असल्याचे चौकशी दरम्यान निष्पन्न झाल्याचे बांगलादेशी विशेष पथकाने तक्रारदार महिलेला पत्राद्वारे कळविले आहे. मन्नत निजाम अन्सारी असे या बांगलादेशी महिलेचे नाव आहे. या महिलेची बांगलादेशी विशेष पथक कसून चौकशी करीत आहेत.
स्थानिक तरुणांच्या मदतीने बांगलादेशी रहिवासी असणाऱ्या तरुणीने पेण शहरात आपले वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती. अनेक दिवसांपासून स्थानिक तरुणांच्या मदतीने या तरुणीने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. या तरुणीला तिचे बांगलादेशी अस्तित्व लपविण्यासाठी पेण मधील दोन तरुणांनी मदत केली असल्याची चर्चा पेण शहरात आहे. ही तरुणी बांगलादेश मधील कोणत्या शहरातील आहे हे अद्याप समोर आलेले नाही.
जिल्हा पोलिसांच्या बांगलादेशी विशेष पथकाने एक स्थानिक महिलेच्या तक्रारीवरून या महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेऊन अलिबाग येथे आणण्यात आले. पोलिसांनी तरुणीची चौकशी केली परंतु तिने अगोदर बांगलादेशी नसल्याचा सूर धरला होता. परंतु सखोल चौकशी केल्यानंतर तपासात ती तरूणी बांगलादेशी असल्याचे पोलिसांना निष्पन्न झाले आहे .
पेणमधून बांगलादेशी महिलेला ताब्यात घेतले आहे. त्या महिलेची चौकशी सुरू आहे. 2017 मध्ये देशात येऊन ती पुन्हा बांगलादेश मध्ये परत गेली होती 2023 मध्ये ती पुन्हा भारतात येऊन पेण येथे वास्तव्यास आहे. तिच्याकडून अधिक चौकशी केली जाणार आहे अशी माहिती बांगलादेशी विशेष पथकाने दिली आहे






