तिघांवर गुन्हा दाखल
| रेवदंडा | प्रतिनिधी |
हुजरा मोहल्ला बोर्ली येथे शेजारील वादातून तिघांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली आहे. फिर्यादीच्या मुलाने शेजारच्या मुलीला दिलेल्या इशाऱ्यावरून वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपींनी घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली. तसेच बाहेर पडताना दगडफेक करून फिर्यादी व त्यांच्या मुलास किरकोळ दुखापत केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सहायक फौजदार मिलिंद सुर्वे करीत आहेत.






