भारतीय हॉकीला ओडिशाचा सहारा

150 कोटींच्या मदतीसह दिले प्रायोजकत्व
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
ओडिशाने 2018 मध्ये सहारा गेल्यावर बेसहारा झालेल्या भारतीय संघाला प्रायोजकत्व दिले. त्यासाठी पाच वर्षांचा करार आणि 150 कोटींची घसघशीत मदत केली. त्या सगळ्याच्या बळावर हॉकीने आज कात टाकली आहे. राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये ओडिशाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय हॉकीचे वैभव परत आणण्यासाठी त्यांनी हा पुढाकार घेतला आणि टोक्यो ऑलिम्पिकमधील या यशामुळे हा उपक्रम बर्‍याच प्रमाणात यशस्वी होताना दिसत आहे.

भारतीय महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठली. तर, पुरुष हॉकी संघाने 49 वर्षांनंतर हा पराक्रम केला. राष्ट्रीय संघाचा प्रायोजक म्हणून 2018 पासून ओडिशा सरकार भारताच्या राष्ट्रीय हॉकी संघाशी (पुरुष-महिला, कनिष्ठ-वरिष्ठ दोन्ही) जोडलेले आहे. राष्ट्रीय खेळ हॉकीमध्ये ओडिशाचे महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि त्याच्या राज्यातील अनेक खेळाडू भारतीय संघात प्रतिनिधित्व करतात. तसेच हॉकीच्या प्रगतीसाठी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचाही नेहमी पुढाकार असतो.

ओडिशाने 2018 मध्ये सहारा गेल्यावर संघाला प्रायोजकत्व दिले. 150 कोटी रुपये आणि पाच वर्षाच्या करारावर हे प्रायोजकत्व होते. त्या सगळ्याच्या बळावर हॉकीने कात टाकली. 2018मध्ये, टाटा समूहाच्या सहकार्याने, राज्य सरकारने कलिंगा स्टेडियममध्ये हॉकी हाय परफॉर्मन्स सेंटरची स्थापना केली. यात 12 केंद्रे आहेत, ज्यात 2,500पेक्षा जास्त तरुण प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण दिले जात आहे. राज्यातील 20 क्रीडा वसतिगृहांपैकी सुंदरगडमधील दोन हॉकीसाठी समर्पित आहेत. राज्य सरकार आता जिल्ह्यातील सर्व 17 ब्लॉक्समध्ये 17 एस्ट्रो टर्फ स्थापन करण्याचे काम करत आहे.

Exit mobile version