| कोर्लई | प्रतिनिधी |
जनगणना 2027 च्या अनुषंगाने मुरुड तालुक्यातील पहिल्या टप्प्यात दि.15 मे ते 15 जून या कालावधीत घराची यादी आणि गृहनिर्माण गणना करीता नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक घरोघरी भेट देत आहे. घरांच्या भेटी दरम्यान आवश्यक माहिती गोळा करण्यात येऊन घरगणना व जनगणना करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य जनगणना संचालनालयाचे संयुक्त सचिव आणि मुख्य प्रधान जनगणना अधिकारी यांच्याकडील पत्रान्वये जनगणना-2027 चा कार्यक्रम आखून दिलेला आहे. पहिल्या टप्प्यातील कामकाज म्हणजेच स्वतःची गणना ही दि.1 ते 15 मे या कालावधीमध्ये तसेच घर यादी व घरगणना दि.16 मे ते 14 जून या कालावधीत नियोजीत आहे. या कालबद्ध कार्यक्रमानुसार मुरूड व रायगड जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात घराची यादी आणि गृहनिर्माण गणना दि.1 मे ते दि.15 जून दरम्यान होणार आहे.







