छातीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद चव्हाण
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत मेडिकल असोसिएशनतर्फे नुकतेच क्रॉनिक कफ (दीर्घकालीन खोकला) या विषयावर ओलेंडर फार्म येथे वैद्यकीय शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी कोकिलाबेन हॉस्पिटलचे प्रख्यात छाती रोगतज्ज्ञ डॉ. विनोद चव्हाण हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानात डॉ. विनोद चव्हाण यांनी कर्जत परिसरात श्वसनविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याची चिंता व्यक्त केली. पूर्वी निसर्गरम्य असलेले कर्जत आता मुंबई पुण्यासारखे प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. कर्जतमध्ये वाढते बांधकाम, विकासकामे तसेच मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड यामुळे प्रदूषण वाढत असून त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी अधिकाधिक वृक्ष लागवड करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांना आणि प्रशासनाला आवाहन केले.
कार्यक्रमाला डॉ. आशुतोष कुलकर्णी, डॉ.मनोहर साबणे, डॉ. प्रेमचंद जैन, डॉ. हेमंत गांगोलिया, डॉ. बी.जी.लाड , डॉ. सुहास शितुत, डॉ. आशिष कर्वे, डॉ. रितेश जैन, डॉ. राहुल ओसवाल, डॉ. कुमार ओसवाल, डॉ. विकास गोमारे, डॉ. शर्वाणी कुलकर्णी, डॉ. दिगंबर पवार, डॉ. गजानन चव्हाण तसेच असोसिएशनचे सदस्य आणि कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.शेवटी डॉ. गणेश मेंगाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.






