| मुंबई | प्रतिनिधी |
1993 च्या साखळी बॉम्बस्फोटासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. या स्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. बॉम्बस्फोटानंतर तब्बल 31 वर्षांनंतर न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागेले होते. यासह टाडा न्यायालयाने इरफान आणि हमीदुद्दीन यांना दोषी घोषित केले होते.
1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करिब टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते.टुंडावर देशात विविध ठिकाणी दहशतवादाचे खटले प्रलंबित आहेत. टुंडाने तरुणांना भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रशिक्षण दिल्याचा आरोप आहे. जुनैद या पाकिस्तानी नागरिकासह त्याने 1998 मध्ये गणेशोत्सवादरम्यान दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखल्याचेही बोलले जाते. या सर्व आरोपींविरुद्ध टाडा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत दीडशेहून अधिक जणांची साक्ष घेण्यात आली.
मोठी बातमी! 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपीची निर्दोष सुटका
