| पाताळगंगा | प्रतिनिधी |
आज समाजामध्ये भोंदू बाबा मोठ्या संख्येने सक्रिय असून अनेकजण त्यांच्या या भुलथापांना बळी पडत असतात. यातच ते महिलांचे लैंगिक शोषण करीत असतात. मात्र प्रत्येकामध्ये जनजागृती व्हावी या उदात्त विचारातून खोपोली येथे रांगोळी स्पर्धेत श्रावणी रोशन पाटील हिने काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधले गेले. जागरूक बना, भोंदूपणाला नाही म्हणा, या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकाविला.
महाराष्ट्र ही संताची भूमी आहे.मात्र याच भूमीत भोंदू बाबा नी कळस गाठलाय आहे. अशोक खरात यांच्याकडे गेलेल्या महिलांचे लैंगिक शोषण केले. याने केलेले दुष्कर्म यामुळे प्रत्येकानी या पासून काही तरी शिकले पाहिजे. मात्र आपल्याला गोड बोलून ते जाळ्यात ओढत असतात. मात्र यापासून सावध राहिले पाहिजे.
श्रावणी रोशन पाटील हिने चार तास अविरत मेहनत घेऊन उत्तम अशी रांगोळी काढली. तिने काढलेल्या रांगोळीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.या माध्यमातून त्याने प्रत्येकाला एक संदेश देऊन समाज जनजागृतीचा पाया रचत आहे.आजवर त्यांनी विविध माध्यमातून रांगोळी काढून अंधश्रद्धा, यावरती तिने समाज प्रबोधन केले त्यांनी काढलेली ही रांगोळी खऱ्या अर्थाने समाजाच्या हिताचे ठरले असून प्रत्येकाने त्यापासून चांगला बोध घेऊन आपल्यामध्ये परिवर्तन करणे गरजेचे आहे. यावेळी प्रथम क्रमांक आलेल्या पाटील ह्यांस सन्मानचिन्ह पैठणी व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.






