। मुंबई । प्रतिनिधी ।
काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधी यांची बिनविरोध निवड करण्यास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोध दर्शवला आहे. राहुल गांधी यांची काँग्रेस अध्यक्षपदी बिनविरोध निवड व्हावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र काँग्रेसच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा प्रस्ताव मांडला होता. त्या बैठकीत उपस्थित सर्वांनी पाठिंबा दिला; मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी हात वर केला नसल्याची माहिती आहे.
काँग्रेस हायकमांडला पत्र लिहिणार्या 23 नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण हे एक आहेत. काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा, ही या नेत्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबईत काँग्रेसच्या 553 प्रतिनिधींच्या बैठकीत राहुल गांधी यांना अध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.