| उरण | वार्ताहर |
पद्धमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त वीर वाजेकर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य,डॉ. पी.जी.पवार ,रक्तपेढीचे प्रमुख सावंत, उपप्राचार्य, डॉ.विलास महाले,प्रा.उत्तम घोरपडे, प्रा.राम गोसावी,प्रा.एम.सी.सोनवणे,प्रा.गजानन चव्हाण,प्रा.बळीराम पवार,डॉ.स्मिता तांदळे,प्रा.इनामदार,प्रा.योगेश कुलकर्णी, डॉ.आमोद ठक्कर, डॉ.राहुल पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.चिंतामण धिंदळे यांनी केले,आभार प्रा.संतोष देसाई यांनी मानले,सूत्रसंचालन प्रा.श्रीकांत गोतपगार यांनी केले.डॉ.रत्नमाला जावळे, यांनी केले. प्रा. बबन जाधव यांनी सदिच्छा भेट दिली.एकूण 51 बाटल्या रक्तदान संकलित झाले.