रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील पुलांचा आराखडा

मुंबई

    मुंबई,प्रतिनिधी

 उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी रेवस रेड्डी सागरी महामार्गाच्या उभारणीबाबत दि.10 मे, 2021 रोजीच्या आढावा बैठकीमध्ये या पूलांचा   आराखडा तयार करण्यास मान्यता दिली आहे. 

राज्य शासनाने कोकण विभागातील रेवस-रेड्डी हा सागरी महामार्ग विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यास कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून नियुक्त केले आहे. त्यानुसार महामंडळामार्फत सदर सागरी महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा  तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर असून या सागरी महामार्गाच्या आखणीमध्ये प्रामुख्याने 1. रेवस ते कारंजा पूल, 2. रेवदांडा ते कोर्लई पूल, 3. दिघी ते आगरदांडा पूल, 4.बाणकोट खाडी पूल, 5. साक्षी व केळशी पूल, 6. दाभोळ ते वेलदूर पूल, 8. साक्षी ते पाथर पूल, 8. कुणकेश्‍वर पूल, 9. वरवडे येथील पूल, 10. कोलम खाडीवरील पूल या पूलांचा समावेश आहे.यानुषंगाने पालकमंत्री  अदिती तटकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना महामार्गावरील प्रामुख्याने 1. रेवस ते कारंजा पूल, 2. दिघी ते आगरदांडा पूल व 3. बाणकोट खाडी पूल या पूलांसह उर्वरित पूलांसाठी खलेपळल आखणी व आराखडा तयार करावा आणि त्याप्रमाणे प्रकल्प विकास आराखड्यामध्ये समावेश करावा, असे लेखी कळविले आहे.

Exit mobile version