लशीचा दुसरा डोस मिळवताना नागरिक हैराण

पुणे

पुणे । वृत्तसंस्था ।

 करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी लसीकरणाची प्रक्रियाही वेगात सुरू आहे. लशीचा पहिला डोस घेऊन 28 दिवसांचा कालावधी पूर्ण के लेले लाभार्थी सध्या दुसरा डोस घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत, मात्र अ‍ॅप किं वा संके तस्थळावर नाव नोंदणी करताना बराच वेळ वाया जात असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. त्यामुळे थेट लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे सोयीचे ठरत असल्याचे नागरिक सांगत आहेत.देशात 16 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी आणि त्यापाठोपाठ इतर आघाडीच्या क्षेत्रातील कर्मचार्‍यांचे लसीकरण सुरू  झाले. 1 मार्चपासून नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला साठ वर्षांवरील सर्व नागरिक आणि त्यानंतर 45 ते 59 वर्ष वयोगटातील सहव्याधीग्रस्त नागरिकांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. त्यापाठोपाठ 45 वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरण सुरू झाले. लस घेण्यासाठी को-विन अ‍ॅप किं वा संके तस्थळावर नाव-नोंदणी करून वेळ निश्‍चित करण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या होत्या. लशीच्या पहिल्या मात्रेसाठी ही सुविधा उपयुक्त ठरली, मात्र दुसर्‍या मात्रेसाठी नावनोंदणी करताना अनेकांना पूर्व नोंदणीचा लाभ घेता येत नसल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे.

Exit mobile version