| कोलाड | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील गणेश नगर येथे रविवारी (दि.15) रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास बाळाराम सखाराम तेलंगे (53), राहणार हेटवणे याचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाल्याची घटना घडली आहे.
कोलाड पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि.15) रोजी संध्याकाळी 4 वाजता आंबेवाडी येथील गणेश नगर येथे बाळाराम सखाराम तेलंगे राहणार हेटवणे हे वेळी काढण्यासाठी पोलावर चढले असता त्यांना विजेचा शॉक लागल्याने ते खाली पडले. त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आंबेवाडी येथे आणले. येथील डॉक्टरांनी तपासले असता त्यांना मयत घोषित केले. कोलाड पोलिस ठाण्यात त्यांच्या आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी कोलाड पोलीस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी जाऊन याविषयी पंचनामा केला असुन, त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोलिस ठाण्याचे अंमलदार एस जी मोरे अधिक तपास करीत आहेत.