‘हा’ अन्याय केंद्र सरकारला महागात पडणार

मुंबई

। मुंबई । विशेष प्रतिनिधी । 

भाजप सरकारने सत्ते आल्यानंतर अनेक अन्यायकारक धोरणे अवलंबविली. मात्र आत प्रश्‍न अन्नदात्याचा आहे. चक्क अन्नदात्यावरच रस्त्यावर उतरण्याची वेळ केंद्र सरकारने आणली. एखाद्या लहानग्यालाही कळावा इतका अन्यायी कायदा आणू पाहणार्‍या सरकारला अद्दल घडविण्यासाठी शेतकर्‍यांसह सर्वच पक्षीय रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी कामगार पक्ष शेतकर्‍यांच्या पाठीशी सुरवातीपासूनच खंबीरपणे उभा राहिला आहे. अशातच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीच कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, स्वाभिमानी पक्ष, जनता दल (सेक्युलर), बहूजन विकास आघाडीआखील भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती आदी सर्वांनीच शेतकर्‍यांना पाठिंबा दिल्याने अन्नदात्याच्या आंदोलनाला अधिक बळ आले आहे. 

Exit mobile version