जिल्ह्यात 1.19 कोटींचा मुद्देमाल जप्त; 72 तासांत कारवाई

| रायगड | खास प्रतिनिधी |

जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यापासून अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईत तब्बल 1 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिली.

रायगड जिल्ह्यामध्ये 32-रायगड लोकसभा मतदार संघासाठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. 16 मार्चपासून आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचार संहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन, राज्य पोलीस विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, जीएसटी विभाग, अमली पदार्थ विरोधी विभाग, पोस्ट विभाग, इंडियन कोस्ट गार्ड, एअरपोर्ट ॲथोरिटी या विविध यंत्रणांच्या माध्यमातून अवैध दारु विक्री, रोख रकमेची हाताळणी याकडे विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती इलेक्शन सिझर मॅनेजमेंट सिस्टिम (इएसएमएस) मध्ये नोंदविण्यात आली आहे.

14 हजार बॅनर्स, झेंड हटवलेः स्नेहा उबाळे
सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्यामार्फत शासकीय जागेतील, सार्वजनिक मालमत्ता तसेच खासगी जागेवरील जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज असे एकूण 14 हजार 559 हटविण्यात आले आहेत. 32-रायगड लोकसभा मतदारसंघातील पेण मतदारसंघात 2 हजार 717, अलिबाग 1 हजार 09, श्रीवर्धन 2 हजार 482, महाड 1 हजार 479 तर 33-मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल 2 हजार 783, कर्जत 3 हजार 687 तर उरणमध्ये 402 पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेट हटविण्यात आले आहेत.
Exit mobile version