दोन अपघातात 1 ठार, 2 जखमी

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल परिसरात झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 1 ठार, तर 2 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील नेरे-पनवेल रोडवर कोप्रोली गावाच्या हद्दीत एमजीएन चिकन शॉपसमोर केटीएम मोटारसायकलवरील चालकाने भरधाव वेगाने मोटारसायकल चालवून दोन इसमास धडक दिली. या अपघातात गोदावरी दुबे (84) यांचा जखमी होऊन मृत्यू झाला आहे तर सतीश दुबे (23) हे जखमी झाले आहेत.

या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तर दुसऱ्या अपघातात मुंबई-पुणे महामार्गावर मुंबई वाहिनीवर शिवकर गावाजवळ बंद पडलेल्या ट्रकला टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे. हा ट्रक मुंबईकडे जात असताना वाटेत बंद पडला होता. दरम्यान, पाठीमागून येणारा टेम्पोचालक लक्ष्मण शिंदे (40) यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने टेम्पो ट्रकवर जाऊन धडकला. या अपघातामध्ये लक्ष्मण शिंदे यांच्या दोन्ही पायांना व डोक्याला दुखापत झाली. त्यांना आयआरबीच्या रुग्णवाहिकेतून कामोठे एमजीएम हॉस्पिटल येथे उपचाराकरिता नेण्यात आले आहे.

Exit mobile version