| पनवेल | वार्ताहर |
उभ्या ट्रेलरला भरधाव वेगाने आलेल्या गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात एक ठार, तर दोन जखमी झाल्याची घटना पनवेलजवळील टी पॉईंट पळस्पे ते जेएनपीटी महामार्गावर रविवारी पहाटे घडली आहे.
पनवेलजवळील टी पॉईंट पळस्पे ते जेएनपीटी महामार्गावर पहाटे रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला हुंडाई गाडीवरील चालकाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात प्रणव कोळगावकर (25) हा गंभीररित्या जखमी होऊन मयत झाला आहे. तर गाडीतील प्रशांत खाडे (25) व शंतनू पोतदार (24) हे जखमी झाले आहेत. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.