भारतात 1 हजार 88 नवे कोरोना रूग्ण

Corona Viruses against Dark Background

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारतात गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 1हजार 88 नवीन प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत, तर 26 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात एकूण सक्रिय रूग्णांची संख्या 10,870 आहे. देशात लसीकरण मोहिमेंतर्गत आतापर्यंत एकूण 15,05,332 लसीकरण करण्यात आले असून गेल्या 24 तासांत एकूण 1,86,07,06,499 लसीकरण करण्यात आले आहे. त्याच वेळी, गेल्या 24 तासात 4,29,323 कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत देशभरात 79.49 कोटी चाचण्या झाल्या आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशातील 29 जिल्ह्यांमध्ये कोरोनास्थिती हाताबाहेर गेली आहे. या जिल्ह्यांचा दैनंदिन कोरोनासंसर्गदर 5 टक्क्यांहून अधिक नोंदवण्यात आला आहे. देशात गेल्या 28 दिवसांमध्ये 5 हजार 474 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. तर, 40 हजार 866 कोरोनाबाधित आढळले. दिलासादायक बाब म्हणजे या चार आठवड्यांमध्ये 58 हजार 158 रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे.

Exit mobile version