पांडवकडा पर्यटनक्षेत्र विकासासाठी 10 कोटी

। पनवेल । वार्ताहर ।
पर्यटन, पर्यावरण व राजशिष्ठाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी पांडवकडा पर्यटनक्षेत्र विकासासाठी 10 कोटीचा विशेष निधी मंजूर केल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात खारघर शहरातील पांडवकडा हे रायगड जिल्हा व नवी मुंबईतील नागरिकांसाठी प्रेक्षणीय पर्यटन क्षेत्र असून वर्षानुवर्ष पर्यटकांची वाढती संख्या पाहता पांडव कडा या पर्यटन क्षेत्राचा विकास पर्यटन खात्यामार्फत व्हावा ही जनतेची मागणी असून या कामामुळे खारघर शहराच्या सौंदर्यात भर पडून स्थानिक नागरिकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. तरी या कामास मंजूरी देऊन निधि उपलब्ध करून देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

या मागणीची दखल घेत या भागाचा विकास करण्यासाठी पहिल्या टप्प्यात 5 कोटी व दुसर्‍या टप्प्यात 5 कोटी असे एकूण मिळून 10 कोटी रुपये मंजूर केले आहे. यासाठी रायगडचे माजी पालकमंत्री आदितीताई तटकरे व शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी सुद्धा या निधीसाठी शासन दरबारी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केला होता.

Exit mobile version