वायू केंद्र दुर्घटना! मृतांच्या कुटुंबियांना दहा लाखांची मदत

| उरण | वार्ताहर |
उरण वायू विद्युत केंद्रात झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या विष्णू पाटील यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत म्हणून महाजनको तसेच ठेकेदारांच्यावतीने 10 लाखांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.
गेल्या रविवारी बॉयलर पंप स्फोट होऊन भयानक अपघात झाला. यामध्ये विवेक धुमाले (कायमस्वरूपी कामगार), कुंदन पाटील (डोंगरी, कायमस्वरूपी कामगार), विष्णु पाटील (बोकडविरा कंत्राटी कामगार) या तरुण कामगारांचा दुर्दैवी निधन झाले. या घटनेमुळे त्या कुटुंबियांवर मोठे संकट आले आहे. त्यांना तातडीची मदत म्हणुन महाजानको व कंत्राटदार सदानंद गायकवाड, राठोड यांनी दहा लाखाचा धनादेश मयत कंत्राटी कामगार विष्णु पाटील यांची पत्नी व आई यांच्याकडे गरुड, कंत्राटदार गायकवाड व राठोड यांनी सुपूर्द केले.

तसेच पत्नीला निवृत्ती वेतन म्हणून दरमहा .16,500 रुपये तसेच विमा व इतर लाभ मिळणार आहेत. तसेच कायमस्वरूपी दोन कामगारांना लवकरच (मृत्यू दाखला आल्यावर ) मंजुरी घेऊन सरकारी नोकरी व आर्थिक नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. विष्णु पाटील यांची पत्नी चडएइ कॉलनी मध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम करीत आहे तिलाही सरकारी नोकरी व सर्व तीन मयत कामगारांचे कुटुंबीयांना रु.50,00000/- नुकसान भरपाई देण्याचे प्रस्ताव महाजनको याना पाठविले आहेत. त्याला मंजुरी मिळेल आशी अपेक्षा आहेच. त्याची प्रत आमदार जयंत पाटील व आमदार बाळाराम पाटील यांना दिली आहे.

यावेळी कामगार नेते कॉ.भूषण पाटील विश्‍वस्त जेएनपीटी, महादेव घरत, बोकडविरा सरपंच सौ.मानसी पाटील,माजी सरपंच भागवान पाटील, अध्यक्ष त्रिशूल ठाकूर, माजी अध्यक्ष सूर्यकांत पाटील, मनोज पाटील.किसान सभा नेते रामचंद्र म्हात्रे,डोंगरी गावाचे किरण घरत ,ग्रामपंचायत समस्या निर्मला पाटील, वंदना पाटील माजी उपसरपंच देवेंद्र पाटील, पराग ठाकूर भूपेश पाटील हे उपस्थित होते.

Exit mobile version