दहा वर्षीय आद्याचा विक्रम; एलिफंटा ते गेट वे पोहून पार केले 12 कि.मी. अंतर

| खारेपाट | प्रतिनिधी |

ठाणे जिल्ह्यातील आद्या आग्रवाल हिने नुकताच एलिफंटा लेणी ते गेटवे ऑफ इंडिया सुमारे 12 कि. मी. समुद्रातील सागरी अंतर पार करुन पराक्रम केला आहे. आद्याच्या प्रशिक्षिक दिपीका पाटील आवास-अलिबाग येथील असून, त्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. लहानपणापासून खेळ आणि फिटनेसबद्दल आवड असणार्‍या आद्याने तिचा वाढदिवसाच्या अनोख्या पद्धतीने साजरा केला. दहाव्या वाढदिवशी एलिफंटा लेणे ते गेटवे ऑफ इंडिया हे 12 कि.मी.चे अंतर तिने 4 तास आणि 16 मिनिटांत पूर्ण केले. स्वीमिंग असोसिएशनच्या वतीने एका विशेष कार्यक्रमात हा पराक्रम केला.

आद्याने पहाटे साडेतीन वाजता पोहोण्यास सुरुवात केली होती. तिच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी स्वीमिंगमध्ये तीला आवड निर्माण झाली आणि तोच छंद तीचा प्राथमिक खेळ झाला. एलिफंटा केव्हज आयलँड ते गेटवे ऑफ इंडिया, मुंबई या 12 किलोमिटरच्या पोहोण्याच्या स्पर्धेत सहभागी होण्याची तिला वयाच्या साडेसहा वर्षांची असताना पहिली संधी मिळाली. त्यानंतर तिने 15 मार्च 2020 रोजी एलिफंटा लेणी ते उरणमधील करंजा जेट्टीपर्यंत 21 किलोमीटरचे अंतर जिद्दीने पार केले.

कोरोनामुळे तिच्या भविष्यातील योजनांना विलंब झाला. आणि तिने दोन वर्षे पोहोणे बंद केले. पण, तिने हार मानली नाही. प्रशिक्षक दिपिका पाटील यांच्यासोबत सराव सुरु ठेवला. आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळे ती हे पराक्रम करु शकली, असा विश्‍वास तिने व्यक्त केला. ती रोज दोन तास सराव करते. तिचे कुटुंब तिच्या आहाराची योग्य काळजी घेते, असेही तिने सांगितले. आद्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Exit mobile version