| पंजाब | वृत्तसंस्था |
पंजाब लुधियाणामधील अमृतसर-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावरील खन्ना येथे दाटलेल्या धुक्यामुळे 100 वाहने एकमेकांवर आदळून विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
जखमींना अधिक उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातात अनेक वाहनांची मोडतोड झाली असून वाहनामध्ये पंजाब रोडवेजच्या बसचाही समावेश आहे. मोठ्या प्रमाणात वाहने एकमेकांवर आदळल्याने रस्त्यावर काही काळ वाहतूक कोडींची समस्याही निर्माण झाली होती. प्रशासन आणि पोलिसांनी खराब झालेली वाहने एका बाजूला काढल्यानंतर आता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली आहे. अपघातामुळे तब्बल 20-25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.