। अलिबाग । वार्ताहर ।
मार्च 2022 मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत कोएसो अॅड. नंदा देशमुख इंग्रजी माध्यम ज्युनिअर कॉलेज, अलिबागचा निकाल 100 टक्के लागला असून समिक्षा रविंद्र पेरेकर हिने 82.83 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम तर तेजस्वी संतोष नागावकर 77.83 टक्के गुण मिळवून व्दीतीय, पायल नरेंद्र कांबळे 77.67 टक्के गुण मिळवून तृतीय आली. तसेच वाणिज्य शाखेचा निकाल 99.39 टक्के लागला असून समृध्दी धनंजय गावंड 90.83 टक्के गुण मिळवून प्रथम,संजना मनोज नाईक 87.17 टक्के गुण मिळवून द्वितीय, ईशिता जितेंद्र निगडे 86.17 टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्थाचे शाळा समितीचे चेअरमन,शाळा समिती सदस्य शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व कर्मचारी वर्गाने अभिनंदन केले.